वसुंधरा संरक्षणाचा संदेश देणाऱ्या जनजागृती बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

कापडी पिशव्यांचा वापर करा; राज्यभर पर्यावरण संवर्धनाचा संदेश

वसुंधरा संरक्षणाचा संदेश देणाऱ्या जनजागृती बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

वसुंधरा संरक्षणाचा संदेश देणाऱ्या जनजागृती बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळा, कापडी पिशव्यांचा वापर करा; राज्यभर पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पंढरपूर : (दि,२०):-महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने पर्यावरण संवर्धन आणि वसुंधरा संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष प्रचार व प्रसिद्धी बसचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या या जनजागृती बसच्या माध्यमातून राज्यातील विविध भागांत पर्यावरण संरक्षणाचा संदेश पोहोचविण्यात येणार आहे. ‘वसुंधरेचे रक्षण करा’, ‘सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळा’, ‘कापडी पिशव्यांचा वापर करा’ आणि ‘निसर्ग वाचवा’ अशा विविध संदेशांद्वारे नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे.प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरणासाठी घातक ठरत असल्याने नागरिकांनी एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा अवलंब करावा, तसेच पर्यावरण संवर्धनासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

यावेळी रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार अभिजीत पाटील, आमदार राजू खरे, नगराध्यक्षा प्रणिती भालके, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संजय भुसकुटे, माजी आमदार शहाजी पाटील, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे आदी उपस्थित होते.