उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार दिंडी सोहळ्यांना कार्पेटचे वाटप
कार्पेट उपलब्ध नसलेल्या दिंडी सोहळ्यांना कार्पेट वाटपा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार दिंडी सोहळ्यांना कार्पेटचे वाटप
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते कार्पेट उपलब्ध; वारकऱ्यांना दिलासा
पंढरपूर, दि. २० : कार्तिकी वारी २०२६ च्या अनुषंगाने वारकरी भाविकांसाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा व सुविधांचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी पंढरपूर येथील विविध ठिकाणी पाहणी केली. यावेळी त्यांनी भक्तीसागर ६५ एकर परिसरातील दिंडी सोहळ्यांच्या निवास व्यवस्थेची पाहणी केली.या पाहणीदरम्यान ज्या दिंडी सोहळ्यांना कार्पेट उपलब्ध नाही, अशा दिंडी सोहळ्यांना तातडीने कार्पेट उपलब्ध करून देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना दिल्या होत्या.त्यानुसार जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते आज कार्पेट उपलब्ध नसलेल्या दिंडी सोहळ्यांना कार्पेट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे भक्तीसागर ६५ एकर परिसरात वास्तव्यास असलेल्या वारकरी भाविकांना दिलासा मिळाला आहे.
यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आदी उपस्थित होते



