औसेकर महाराज परिवारास मातृशोक
ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांना हैदराबाद येथे त्यांच्या आशीर्वाद निवासस्थानी देवाज्ञा
औसेकर महाराज परिवारास मातृशोक
श्रीमती लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज यांना देवाज्ञा
श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान श्रीक्षेत्र औसाचे 4 थे पिठाधीपती सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या धर्मपत्नी आणि विद्यमान पीठाधिपती सद्गुरु श्री गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या मातोश्री श्रीमती लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांना हैदराबाद येथे त्यांच्या आशीर्वाद निवासस्थानी शनिवार दिनांक 22 ऑगस्ट 2026 रोजी रात्री7.50 वाजता देवाज्ञा झाली. रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता औसा येथील पाराबाई येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील श्रीमती लिलाबाई आईसाहेब यांच्या पश्चात श्री गोरखनाथ महाराज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष श्री सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर, श्री बसवंतराव देशमुख चिडगोपा, हे तीन सुपुत्र, सुना ,नातवंड असा मोठा परिवार आहे आईसाहेबांच्या जाण्याने औसेकरमहाराज परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संस्थांन च्या लाखो शिष्य शोक सागरात बुडाला आहे



